तरुणाने चक्क स्मशानभूमीत गळफास घेऊन केली आत्महत्या
तरुणाने चक्क स्मशानभूमीत गळफास घेऊन केली आत्महत्या
वृत्तसंस्था जळगाव- जिल्ह्यातील शिरसोली प्र.बो. येथिल संजय हरी पाटील वय ३२वर्षे या तरुणाने चक्क स्वतःचा गावातील स्मशान भुमितच शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २९ गुरुवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. यामुळे शिरसोली गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय हरी पाटील हा शिरसोली प्र. बो. येथे कुटुंबासह वास्तव्यास असुन तो ट्रक ड्रायव्हर चे काम करीत होता. गुरुवारच्या रोजी संध्याकाळी संजय पाटील याने घरी शिर्डीला जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडला. त्यानंतर संध्याकाळी संजय पाटीलने गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांनी गावातील स्मशानभूमी गाठली असता स्मशानभूमीतील पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गावातील गोलू पवार स्मशान भूमीच्या परिसरातून जात असतांना त्यांच्या लक्षात हि बाब आल्याने तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटील शरद पाटील व श्रीकृष्ण बारी यांना कळविली पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस पोलिसांना कळविली एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले नागरिकांच्या मदतीने संजय पाटील याला खाली उतरवले व जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी यांनी संजय पाटील याला मृत घोषित केले. स्मशानभूमीत संध्याकाळच्या वेळेस संजय पाटील याने आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण गावकरी सुन्न झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत