Header Ads

Header ADS

मोर्शी येथे उद्या प्रकल्पग्रस्तांचा हल्लाबोल होणार


 मोर्शी येथे उद्या प्रकल्पग्रस्तांचा हल्लाबोल होणार  

 

लेवाजगत न्युज:- दिनांक 16 जून 2023 ला प्रकल्पग्रस्तांचा हल्लाबोल होणार

 गेल्या महिन्याभरापासून अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा आत्मक्लेष उपोषणातून सरकारला कुंभकर्णी झोपेतून जागवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मागील 42 वर्षापासून हा विषय प्रलंबित असून आपल्या भागातील लोकप्रतिनिधींची चूप्पी कमालीची विचार करणारी व प्रकल्पग्रस्तांना संकट मालिकेत ढकलणारी दिसते. उपोषणकर्त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने सरकारला जागवण्याचा व प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. 1976 सालापासून प्रकल्पग्रस्तांना सतत संकटांना सामोरे जावे लागत आहे, आतापर्यंत बरेचसे आंदोलने झालेत बरेचसे उठावही झाले, बऱ्याच प्रकल्पग्रस्तांनी विवंचने पायी आत्महत्या केलीत तरीही हे गेंड्याच्या कातडीचे वेगवेगळे सरकार जागे झालेले दिसले नाही. 

मोर्शी येथे उद्या प्रकल्पग्रस्तांचा हल्लाबोल होणार


 आता घडीला हे सर्वच प्रकल्पग्रस्त म्हातारपणाच्या उंबरठ्यावर आहेत सर्वांना तशीही प्राकृतिक मरण काही दिवसांनी येणारच आहे, परंतु आपल्या हक्कासाठी आपण आयुष्यभर लढूनही आपल्याला न्याय मिळाला नाही याचाच न्यूनगंड या सगळ्यांना आहे. आणि हाच न्यूनगंड  घेऊन आम्हाला मरायचे नाही, एवढीच मागणी या सर्व प्रकल्पग्रस्तांची दिसते. म्हणूनच या सर्व वयस्कर प्रकल्पग्रस्तांनी आता ही शेवटची व आरपारची लढाई सुरू करून शासनाला विविध मार्गाने धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून 19 मे 2023 ला आत्मक्लेष उपोषणाला सुरुवात झाली, शासन व प्रशासनाचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने 1 जून 2023 ला नांदगाव पेठ येथील एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद पाडून आंदोलनकर्त्यांनी सरकारला व प्रशासनाला विचारात पाडले.


 एवढे होऊनही शासन स्तरावरून कोणताही योग्य असा प्रतिसाद न मिळताना पाहून दिनांक 6 जून शिवराज्याभिषेक दिनी चक्काजाम करून मोर्शी तहसील समोरील अमरावती नागपूर रोड बंद पडला. प्रकल्पग्रस्त उग्र झालेले पाहून पोलिसांनी या सर्व आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन समज दिली.

    आज तब्बल आत्मक्लेष उपोषणाला संपूर्ण 27 दिवस उलटूनही शासन स्तरावरून व लोकप्रतिनिधींकडून योग्य प्रतिसाद व उत्तर न मिळाल्याने शेवटी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी सिंभोरा धरण (नळ दमयंती सागर) येथून अमरावती शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण आंदोलनाला हल्लाबोल आंदोलन म्हणून प्रकल्पग्रस्तांनी सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. हल्लाबोल आंदोलन दिनांक 16 जून 2023 ला सकाळी दहा वाजता मोर्शी तहसील कार्यालय येथून सुरू होईल व चालत चालत हे सर्व आंदोलनकारी सिंभोरा येथील धरणाच्या मुख्य दरवाजांवर चढून अमरावती शहराला होणारा पाणीपुरवठा तेथील पंप हाऊस व पाईपलाईन फोडून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आणून पाडणार आहेत. अशी माहिती या सर्व प्रकल्पग्रस्तांनी बातमी देतेवेळी दिली. या आंदोलनाला सर्व प्रकल्पग्रस्तांनी व आपल्या भागातील सर्व शेतकरी बंधूंनी आवर्जून उपस्थित रहावे, व आपल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधूंना न्याय मिळावा असे आवाहन संपूर्ण आंदोलनकारी प्रकल्पग्रस्तांनी जनतेला शेतकऱ्यांना व तरुणांना केले आहेत.

उमेश शहाणे,अमोल महल्ले, ज्योतिराम बाणेकर, चरण बायस्कर,अमोल टाकळे, केशवराव गुल्हाने, दिलीपराव पंडागरे, सागर काकपुरे, गजानन पुरी, प्रवीण ढोले, दीपक पाटील,रमेश कांदळकर, रवी काळमेघ, सुरेंद्र काळे, किसनराव ठाकरे, नामदेवराव मुंदाफळे, विठ्ठलराव नागले, विनायक कुरवाडे, नरेश वानखेडे आधी प्रकल्पग्रस्तांनी ही माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.