Contact Banner

कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

Vaḍagāva-yēthīla-colage-śhikṣhaṇa-ghēta-asalēlyā-taruṇa-mulīchī-vihirīta-uḍī-ghē'ūna-ātmahatyā

कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

लेवाजगत न्यूज रावेर- तालुक्यातील वडगाव येथिल कॉलेजच्या तरुण मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने रावेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

   

Vaḍagāva-yēthīla-colage-śhikṣhaṇa-ghēta-asalēlyā-taruṇa-mulīchī-vihirīta-uḍī-ghē'ūna-ātmahatyā

     याबाबत सविस्तर वृत्त असे की  रावेर तालुक्यातील वडगाव येथील कॉलेजला शिक्षण घेणारी शितल मुकेश वाघोदे वय १९ वर्षे राहणार वडगाव तालुका रावेर जिल्हा जळगाव ही तरुण मुलगी बुधवार दिनांक २८ रोजी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून गेली होती.त्यानंतर तिचे अजंदा रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीजवळ शाळेची बॅग चप्पल आणि ओढणी दिसल्याचे रावेर  पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठविले. असता तिच्या बॅगेची  तपासणी केली असता ती शितल मुकेश वाघोदे नावाची मुलगीची  असल्याचे दिसुन आले दिनांक २८/०६/२०२३रोजी संध्याकाळी  ३ चार वाजेच्या दरम्यान  पोलिसांनी घटनास्थळी जावून विहिरीत काम करणाऱ्याला उतरविण्यात आले.

    

Vaḍagāva-yēthīla-colage-śhikṣhaṇa-ghēta-asalēlyā-taruṇa-mulīchī-vihirīta-uḍī-ghē'ūna-ātmahatyā

     त्यांनी एक दीड तास शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या घटनेची माहिती रावेर शहरासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता वडगाव तालुका रावेर येथिल ग्रामस्थांसह शेकडो लोकांनी गर्दी केली होती.घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास नागरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर,पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे,फौजदार सोनवणे,पोलीस विशाल पाटिल,सचिन घुगे,प्रमोद पाटील,सुकेश तडवी यांच्या प्रयत्नाने तिस तासांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार  रोजी वडगाव येथील तरुण विद्यार्थिनी मयत कु.शितल मुकेश वाघोदे वय १९ वर्षे हिस दोनशे फूट खोल असलेल्या विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह पाण्यात दिसल्याने तिचे प्रेत काढण्यात आले.तरुण विद्यार्थिनीने आत्महत्येचे कारण अद्यापही समजु शकलेले नाही.याबाबत सुरेश घनश्याम तायडे राहणार वडगाव तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर,पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.