वाघोदा खुर्द शेत शिवारातून खांबा वरील विद्युतवाहक तार चोरट्यांनी लांबवली
वाघोदा खुर्द शेत शिवारातून खांबा वरील विद्युतवाहक तार चोरट्यांनी लांबवली
लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द शेत शिवारातील गट नंबर मधील खांबावरील विद्युत वाहक तारा अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा गुन्हा सावदा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की वाघोदा खुर्द शेत शिवारात गट नंबर ३२०,३२१,३१९,३१३ मधील सहा खांबावरील चालू स्थितीत असलेल्या अल्युमिनियमची इलेक्ट्रिक तार कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक पाच ते दिनांक सहा च्या दरम्यान चोरून नेल्याचे गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मस्कावद कक्षाचे कनिष्ठ अभियंता भूषण लक्ष्मण पाटील यांच्या खबरेहून दाखल करण्यात आली आहे.
सहा खांबावरील ३५०० फूट लांबीची ३४ स्क्वेअर एमएम ची जुने इलेक्ट्रिक तार २४ हजार रुपये किमतीची अल्युमिनियम इलेक्ट्रिक तार अज्ञात इसमांनी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावदा पोलीस तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत