Header Ads

Header ADS

योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते-डॉ.रविंद्र भोळे

 

Yōgāmuḷē-śharīra-nirōgī-rāhūna-śhaktiśhālī-banatē-ḍr-ravindra-bhōḷē


योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते-डॉ. रविंद्र भोळे 

पुणे कोरेगाव भीमा पेरणे फाटा :यम, नियम, आसन ,प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान ,धारणा ,समाधी इत्यादी अष्टांग योगाचे अंग सांगितलेले आहे. योग क्रिया करताना आसन व प्राणायम महत्वाचे असते. योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली, उर्जासंपन्न होते. योग रोगमुक्त जगण्याचे एक विज्ञान असुन योगामुळे यौगिक शक्ती औषधासारखी शरीरात कार्य करते. शारीरिक ,मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी योग अत्यंत महत्त्वाचा असतो. परमात्मा प्राप्तीसाठी समर्पण महत्त्वाचे आहे, आत्मा शुद्धीसाठी ध्यान महत्त्वाचे आहे, दीर्घायुषी राहण्यासाठी प्राणायम महत्त्वाचे आहे ,शरीर राहण्यासाठी आसन महत्त्वाचे आहे तर रोगमुक्त राहण्यासाठी योगा महत्त्वाचे आहे. योगामुळे शरीर निरोगी राहून शक्तिशाली बनते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे संस्थापक (अध्यक्ष डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग दिल्ली भारत सरकार सलग्नित )यांनी येथे व्यक्त केले. 

Yōgāmuḷē-śharīra-nirōgī-rāhūna-śhaktiśhālī-banatē-ḍr-ravindra-bhōḷē


चंद्रप्रकाश धोका कर्णबधीर निवासी विद्यालय पेरणे फाटा येथे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी योग गुरु म्हणून मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे ह्यांनी वरील मत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक सुभाष कट्यारमल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी या बी.के .प्रतिमा दी.दी, के  के. सुनील भाई, की. के. शिवानी दीदी, श्री श्री. जी. जाधव लोणीकंद संजय सिताराम भामकर शिरूर,नारायण एकनाथ फडतरे, शिरसाठ अण्णासाहेब नारायण  यांची खास उपस्थिती होती, याप्रसंगी शाळेतील मुलांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.