Contact Banner

आदल्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर दुसऱ्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली कोचुरात समाजमन सुन्न करणारी घटना

Adalya-divashi-vadhadivasachya-subhechchancha-varshava-tara-dusarya-divashi-bhavapurna-shraddhanjali-kochurata-samajamana-sunna-karanari-ghatana


आदल्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर दुसऱ्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली

कोचुरात समाजमन सुन्न करणारी घटना

लेवाजगत न्यूज सावदा  -येथून जवळच असलेल्या कोचूर गावात हर्षल पाटील या 31 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनांक 20 रोजी या तरुणाचा वाढदिवस असल्याने  गावातील सोशल माध्यमांवरती वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता  अनेकांना धन्यवाद म्हणून हा तरुण प्रतिसाद  देत होता. 




          पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.दिनांक 21 रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अचानक पोटात दुखू लागल्याने फैजपूर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले फैजपूर येथील येथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला पाठवले जळगाव येथे उपचारादरम्यान  संध्याकाळी या तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी आल्याने ज्या सामाजिक माध्यमांवरती वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे चालू होते त्याच सामाजिक माध्यमांवरती भावपूर्ण श्रद्धांजली चा संदेश सुरू झाला तरुणाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे कोचूर गावावर शोक कळा पसरली आहे.हर्षल हा घरातील  एकुलता एक मुलगा होता तर दोन बहिणींचा एकटाच भाऊ होता. दिनांक 21 रोजी संध्याकाळी सात वाजता या शोकांकूल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांचे डोळेही पानावले होते. यावेळी संपूर्ण कोचर गावातून नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी  उपस्थिती लावली होती अतिशय स्वजळ स्वभावाचा तरुण असंल्याने त्याच्या अशा अचानक जाण्याने समजमान सुन्न झाले आहे गावातील अनेक घरात चुलही पेटली नव्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.