Contact Banner

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री राजभवनात घेतली शपथ

 

Ajit-Pawar-New-Deputy-Chief-Minister-of-Maharashtra-sworn-in-at-Rajbhavan

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री राजभवनात घेतली शपथ 

लेवाजगत न्यूज मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या ५४आमदारांपैकी ३०आमदार अजित पवारांसह राजभवनात हजर आहेत.

   राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात उपस्थित आहेत. अखेर अजित पवार आता आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे.

   अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.