अमेरिकन एज्युग्लोबल स्कूलचा भारतात विस्तार मुंबईत लवकरच भव्य कॅम्पस
अमेरिकन एज्युग्लोबल स्कूलचा भारतात विस्तार
मुंबईत लवकरच भव्य कॅम्पस
उरण (सुनिल ठाकूर )अमेरिकन एज्युग्लोबल स्कूल संचलित न्यू जर्सी येथील सॅडल रिव्हर डे स्कूलचा भारतात लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आणि केंब्रिज संलग्नित तसेच ६५ वर्षांची परंपरा असलेल्या या शाळेच्या संपूर्ण भारतात अनेक शाखा येत्या काळात सुरू करण्यात येणार असून मुंबईसह लखनौ, सिरसा आणि पुणे येथे सुद्धा कॅम्पस स्थापन करण्याची योजना आखलेली असल्याचे एईएसचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. सामल यांनी यावेळी सांगितले. यावेळी एईएसचे व्यवस्थापकीय संचालक पी के सामल, रीवर डे स्कूलचे प्रमुख जलज देसाई, सॅडल रिव्हर स्कूल, न्यू जर्सीचे चीफ ग्लोबल इम्पॅक्ट ऑफिसर डॉ. केविन मर्जेस, इडोव्हो वेंचर्सचे संचालक आनंद खन्ना, तरुण उद्योजक चंदन सामल उपस्थित होते.
यावेळी सामल म्हणाले की,"आपला मुंबई परिसर नावीन्यपूर्ण आणि प्रगतीचे प्रतीक असेल, जे विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख अभ्यासक्रम तसेच क्रीडा आणि सह-अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये भरपूर संधी प्रदान करेल." जलज देसाई म्हणाले की, “आम्ही संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचे पालनपोषण करण्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना एक मजबूत इकोसिस्टम प्रदान करतो. यावेळी आनंद खन्ना म्हणाले की, "एईएस हे शैक्षणिक कार्यपद्धतीच्या सक्षमतेचे प्रतीक आहे आणि आम्ही या बदलाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहोत."
शैक्षणिक अनुभव अधिक वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने भारतीय आणि अमेरिकन विद्याशाखांचे वैविध्यपूर्ण मिश्रण गुंतवून ठेवण्याची योजना आखत आहे. तसेच केविन मर्गेस म्हणाले की, संस्थेचा मुंबईचा विस्तार हा भारताला सर्वोत्कृष्ट जागतिक आणि भविष्यकालीन शिक्षणाशी जोडण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे."


कोणत्याही टिप्पण्या नाहीत