Contact Banner

पहिली राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धामध्ये रायगड जिल्हाला प्रथम अजिंक्यपद

First-State-Level-Thai-Kick-Boxing-Competition-First-Championship-for-Raigarh-District


पहिली राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धामध्ये रायगड जिल्हाला प्रथम अजिंक्यपद

उरण (सुनिल ठाकूर )दिनाक 1,2 जुलै रोजी सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट येथे झालेल्या  पहिल्या राज्यस्तरीय निवड चाचणी थाई किकबॉक्सिंग स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झाली  नागपूर, पनवेल, नाशिक, पिंपरी चिंचवड, रायगड पुणे व सोलापूर जिल्ह्यांमधून स्पर्धक आले होते स्पर्धेचे विजेतेपद 51 सुवर्णपदकासह रायगड जिल्ह्याने फटकाविले तर उपविजेतेपद 27 सुवर्णपदकासह पिंपरी चिंचवड खटकाविले तर पुणे जिल्ह्याने 20 सुवर्णपदकासह तृतीय क्रमांक फटकावले.

First-State-Level-Thai-Kick-Boxing-Competition-First-Championship-for-Raigarh-District



स्पर्धेतील प्रो टायटल बेल्ट स्पर्धेत

पुरुष गटात

50 किलो खालील वजन गटात रायगडचा  दीपक पवार विजेता   60किलो वरील वजनगटात पनवेलचा साहिल सिनारे विजेता ठरला विजय झालेल्या सर्व खेळाडूंची निवड गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूट चे  वाडेकर सर महाराष्ट्र थाईबॉक्सिंग चे कार्याध्यक्ष संतोष म्हात्रे सचिव निलेश भोसले सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हिम्मत डेंगळे, विकास बडदे, अतुल गोडसे ,चिंतामणी मोकल, मोहिन बागवान, परवेज शेख , प्रवीण वाघ, सचिन लिमसे ,अनुज भोसले , वरद केनी,  रोहित थळी ,कार्तिक वाघ यांच्या हस्ते झाले सर्व विजेता खेळाडूंना  ऑल इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशन चे  अध्यक्ष संतोष म्हात्रे व यु.स.के.ऐ इंडियाचे अध्यक्ष मंदार पनवेलकर  सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

First-State-Level-Thai-Kick-Boxing-Competition-First-Championship-for-Raigarh-District


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.