Contact Banner

बरेलीत कावड यात्रेवर दगडफेक, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

 

In Bareilly-Kavad-Yatra-Stone-pelting,-police-arrangement-deployed at the incident site.

बरेलीत कावड यात्रेवर दगडफेक, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

 वृत्तसंस्था बरेली- उत्तर प्रदेशातील बरेली येथे कावड यात्रेवर जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या कावड यात्रेत जवळपास २ हजार भाविकांचा समावेश होता. ही कावड यात्रा पवित्र जल भरण्यासाठी जात असताना जोगी नवादा भागातील शाहनूरी मशीद परिसरात हा हल्ला झाला. या घटनेत सुमारे डझनभर भाविकांसह काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

    बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कावड यात्रा कछला घाट येथून पवित्र जल आणण्यासाठी जात होती. यावेळी शाहनूरी मशीद आणि आसपासच्या घरांवरून या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

   वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी सांगितलं, “आज बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावड यात्रा निघाली होती. ही यात्रा एका धार्मिक स्थळाजवळून जाताच या यात्रेवर काहीतरी फेकलं. यामुळे दोन गटात वाद झाला. त्यातून दगडफेक झाली. पोलिसांना मिळालेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक केल्याचं दिसत आहे.”

   हा प्रकार घडल्यानंतर पोलीस दलाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कावड यात्रेनं पुढे मार्गक्रमण केलं. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालं नाही, असेही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.