Contact Banner

मृतावस्थेमध्ये फुलगाव येथे तरूण आढळला,अकस्मात मृत्यूची नोंद

Mr̥tāvasthēmadhyē-phulagāva-yēthē tarūṇa-āḍhaḷalā,-akasmāta-mr̥tyūcī-nōnda


 मृतावस्थेमध्ये फुलगाव येथे तरूण आढळला,अकस्मात मृत्यूची नोंद  

लेवाजगत न्यूज वरणगाव- शहरातील सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डंपिंग ग्राउंड जवळील मोकळ्या जागेत एक तरुण मृतावस्थेत आढळला होता. कल्पेश चंद्रकांत कल्पेश चौधरी चौधरी (वय २४, रा. फुलगाव ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे. 

Mr̥tāvasthēmadhyē-phulagāva-yēthē tarūṇa-āḍhaḷalā,-akasmāta-mr̥tyūcī-nōnda


         मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्पेश चौधरी याचे रेल्वे स्टेशन रोडवरील वरणगाव ग्रामीण रुग्णालयासमोर दिव्य चाट व पाणीपुरी विक्रीचे दुकान होते. कल्पेश ३ जुलैला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. ४ जुलैला मंगळवारी सायंकाळी नागेश्वर मंदिरासमोरील सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडच्या मोकळ्या जागेत तो विषारी औषध सेवन करुन मृतावस्थेत मिळून आला. खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. याप्रकरणी चंद्रकांत चौधरी (वय ५८, रा. फुलगाव) यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.