साहित्यसंपदा तर्फे डॉ.शिल्पा पाटील यांच्या दर्पण काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ रविवारी डोंबिवली येथे
साहित्यसंपदा तर्फे डॉ.शिल्पा पाटील यांच्या दर्पण काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ रविवारी डोंबिवली येथे
लेवाजगत न्यूज डोंबिवली-साहित्यसंपदातर्फे डॉ.शिल्पा पाटील यांच्या 'दर्पण' या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. मूळ भुसावळ जि.जळगावच्या पण ह.मु .खारघर येथे राहणाऱ्या कवयित्री डॉ.शिल्पा पाटील (नेत्ररोग तज्ज्ञ ) यांचे मनाचे उदगार व्यक्त करणाऱ्या हिंदी कवितांचा 'दर्पण' हा कवितासंग्रह दि. २३ जुलै २०२३ रोजी गणपती मंदिराच्या ' विनायक सभागृहात ' डोंबिवली येथे प्रकाशित होणार आहे .सदर पुस्तकास ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ. राम नेमाडे ह्यांची प्रस्तावना आणि मार्गदर्शन लाभले आहे.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.राम नेमाडे सर , अथतिथीगणांत इतिहासकार डॉ. नि.रा.पाटील,परिवर्तन शिक्षण संस्था अंबरनाथचे सचिव श्री किसन वराडे ,कवयित्री लिला गाजरे,कादंबरीकार श्री सुनिल जावळे,साहित्यिक व समाजसेवक श्री हेमंत नेहते ह्यांची प्रमुख उपस्थिती प्रकाशन सोहळ्यास लाभणार आहे.कवयित्री डॉ शिल्पा पाटील यांची उपस्थिती असणारच, हे वेगळे सांगायला नको.
सदर कविता फक्त हिंदी भाषिकांच्याच नव्हे तर मराठी रसिकांच्या मनाला सुद्धा गारुड घालतील,असा विश्वास साहित्यसंपदा प्रकाशक श्री वैभव धनावडे ह्यांनी बोलून दाखविला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत