Contact Banner

१५ लाखाची लाच घेताना नाशिक चे तहसीलदार ए सी बी च्या जाळ्यात

 

15-lakh-while-taking-a-bribe-of-Nashik-Tehsildar-A-C-B-in-the-net

१५ लाखाची लाच घेताना नाशिक चे तहसीलदार ए सी बी च्या जाळ्यात 

लेवाजगत न्यूज नाशिक -मुरूम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड आणि स्वामित्व धन जागाभाडे मिळून एक कोटी २५ लाखांचा दंड कमी करण्यासाठी तसेच स्थळ निरीक्षणासाठी १५ लाखांची लाच घेताना नाशिकचा तहसीलादर नरेशकुमार बहिरम (४४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने शनिवारी (दि. ५) रंगेहाथ अटक केली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अाणि तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, राजूर बहुला येथील जमीनमालकाने मुरूम उत्खनन केले होते. याबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड स्वामित्व धन जागाभाडे मिळून एक कोटी २५ लाख दंड अाकारणी केली होती. याबाबत तहसीलदार नरेशकुमार बहिरमच्या कार्यालयाचे अादेश अाले होते. याविरोधात जमीनमालकाने अपील दाखल केले होते. या अादेशाच्या फेरचौकशीसाठी तहसीलदार बहिरमकडे अपील केले होते. मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीनमालकाने प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. ही बाब पडताळणीसाठी बहिरमने जमीनमालकाला राजूर बहुला येथे स्थळ निरीक्षणवेळी बोलावले होते. मालक वयोवृद्ध अाणि अाजारी असल्याने त्यांनी तक्रारदारांना कायदेशीर कारवाईसाठी अधिकारपत्र दिले होते. तक्रारदार स्थळ निरीक्षणाच्या वेळी तहसीलदार बहिरम यास भेटले. बहिरम याने तडजोडीसाठी १५ लाख लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बहिरम याने लाचेची रक्कम घेऊन सिटी सेंटररोडवरील निवासस्थानी बोलवले. पथकाने लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केली. निरीक्षक संदीप घुगे, स्वप्निल राजपूत, गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे, यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

     बहिरम फेब्रुवारी २०२३ मध्ये नाशिक तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी ते विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदार होते. २०२० पूर्वी त्र्यंबकेश्वर कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला होता. दरम्यान, तहसीलदारपदी रुजू झाल्यावर एन. ए. आणि कुठल्याही जमिनीशी निगडित प्रकरणातील फाइल ते निकाली काढत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत नाशिक प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्याबाबत सोमवारीच प्रांताधिकाऱ्यांकडून निर्णय होण्याची शक्यता असताना दुपारी तीननंतर बहिरम यांच्या घरीच हा ट्रॅप पुढे आव्हान काय अँटी करप्शन ब्युरोने केल्याने एकच खळबळ उडाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.