उद्या येणार रजनीकांत यांचा जेलर,दक्षिण भारतात कंपन्यांनी दिली गुरुवारी सुटी
उद्या येणार रजनीकांत यांचा जेलर,दक्षिण भारतात कंपन्यांनी दिली गुरुवारी सुटी
चित्रपट वृत्त-10 ऑगस्ट रोजी सुपरस्टार रजनीकांत दोन वर्षांनी जेलर चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहेत. दक्षिणेत उत्सवासारखे वातावरण आहे. ठिकठिकाणी रजनीकांत यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले असून, त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात येत आहे. आगाऊ बुकिंग 5 ऑगस्टपासून सुरू झाले आणि काही वेळातच 15 ऑगस्टपर्यंतचे सर्व शो तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये बुक झाले.
ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ₹5,000 पर्यंत तिकिट ब्लॅकमध्ये विकले जात आहेत. यासाठी कोणतीही किंमत मोजायला चाहते तयार आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अनेक कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना चित्रपटाची तिकिटेही दिली जात आहेत. रसिकांमध्ये फर्स्ट-डे, फर्स्ट शो अशी स्पर्धा सुरु आहे. एका चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकावर चाहत्यांनी चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने हल्ला केला. व्यवस्थापक सध्या रुग्णालयात दाखल आहे.
केवळ भारतातच नाही तर परदेशातही रजनीकांतच्या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. जेलर हा अमेरिकेतही सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरेल असा अंदाज आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत जेलरने ॲडव्हान्स बुकिंगमधून जगभरातून ₹ 122 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या जगभरातील क्रेझचा अंदाज यावरून लावता येतो की, गदर-2 आणि OMG-2 हे दोन मोठे बॉलीवूड चित्रपटही 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत, मात्र या दोन्ही चित्रपटांपेक्षा जेलरचे आगाऊ बुकिंग कितीतरी पटीने खूप जास्त आहे.
रजनीकांतचा चित्रपट रिलीज होण्याआधी, त्यांचे चाहते ऑफिसमधून एक दिवस सुट्टी घेण्यासाठी अर्ज करू लागतात, जेणेकरून त्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता येईल. हा ट्रेंड रजनीच्या याआधीच्या कबाली, काला आणि २.० या चित्रपटांमध्येही दिसून आला होता आणि आता हाच ट्रेंड जेलरसाठीही पाहायला मिळत आहे.
चेन्नई आणि बंगळुरूमध्ये 10 ऑगस्टला अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मदुराई-स्थित Uno Aqua Care नावाच्या कंपनीने 10 ऑगस्ट रोजी चेन्नई, बेंगळुरू, त्रिची, तिरुनेलवेली, चेंगलपट्टू, मट्टुथावानी, अरपलायम, अलगप्पन नगर येथील केंद्रांवर 2 ऑगस्ट रोजी सुट्टीची नोटीस जारी केली आहे. त्यात लिहिले आहे की, 'सुपरस्टार रजनीचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे आणि आम्ही या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. आम्ही एक पाऊल पुढे जाऊ आणि आमच्या कर्मचार्यांना अँटी पायरसीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटाची मोफत तिकिटे देऊ.
याशिवाय, सेलम सर्व्हे ग्रुप या डिजिटल सर्वेक्षण कंपनीने चेन्नई, बेंगळुरू, कोईम्बतूर, गोवा, मुंबई आणि ओडिशा येथील केंद्रांवर सुट्टीसह विनामूल्य चित्रपट तिकिटे देखील वितरित केली आहेत.
व्यापार तज्ज्ञ मनोबाला विजयबालन यांच्या मते, BookMyShow या ऑनलाइन तिकीट विक्री पोर्टलवर सोमवारपर्यंत जेलरसाठी 7,50,000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत.
शनिवारी 85,330 तिकिटांची विक्री झाली, तर रविवारी हा आकडा 2,33,150 वर पोहोचला. तर सोमवारी 2,93,330 तिकिटांची विक्री झाली आहे.
आगाऊ बुकिंगच्या बाबतीत जेलरने वारिसू आणि पोन्नियान सेल्वन 2 चे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. रविवारपर्यंत जगभरातील आगाऊ बुकिंग 14.5 कोटींवर पोहोचले, तर सोमवारपर्यंत हा आकडा 20 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
चित्रपटाचे सर्वाधिक आगाऊ बुकिंग तामिळनाडूमध्ये झाले आहे जेथे दोन लाख बारा हजार आगाऊ तिकिटांची विक्री झाली आहे. कर्नाटकातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. येथे एकट्या बंगळुरूमध्ये 2 कोटी रुपयांपर्यंतची आगाऊ तिकिटे विकली गेली आहेत.
जेलरच्या प्री-रिलीज बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 122 कोटींची कमाई केली आहे. जेलरने तामिळनाडूतून 62 कोटींचा व्यवसाय केला आहे. तेलगू राज्यांत १२ कोटी रु. कर्नाटकमध्ये 12 कोटी, केरळमध्ये 5.50 कोटी आणि देशातील इतर राज्यांमध्ये 3 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशातही रिलीजपूर्वी 30 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे एकूण बजेट 240 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत ब्रेक इव्हनसाठी केवळ 118 कोटी रुपये आहेत.
तामिळनाडूतील रजनीकांतचे चाहते एका गोष्टीमुळे निराश झाले आहेत. वास्तविक, राज्य सरकारने चित्रपटांच्या पहाटेच्या शोवर बंदी घातली आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाचा शो सकाळी 4, 6 किंवा 7 या वेळेत ठेवता येणार नाही. पहिला शो सकाळी ९ वाजल्यापासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मोठ्या स्टार चित्रपटांच्या पहाटेच्या शोमधून वितरकांना फायदा होत असे, पण पहिल्या दिवसाच्या फर्स्ट शोमध्ये एका मुलाचा अपघात झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये हा ट्रेंड थांबला. यानंतर राज्य सरकारने अशा सर्व मॉर्निंग शोवर बंदी घातली असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
चित्रपटगृहाबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी कोणीही तारेचे मोठे कटआऊट लावू नयेत, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे. पूर्वी, मणिरत्नमच्या पोन्नियन सेल्वन 2 आणि माविरन सारख्या चित्रपटांचे सकाळी 9 वाजण्यापूर्वी कोणतेही शो नव्हते.
अमेरिकेतही जबरदस्त क्रेझ
जेलरची क्रेझ फक्त भारतातच नाही. दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या चित्रपटाची अमेरिकेतही प्रचंड क्रेझ आहे, त्यामुळे सोमवारपर्यंत येथे $664,000 ची आगाऊ तिकिटे विकली गेली आहेत. या संदर्भात, द जेलर नेल्सनच्या मागील चित्रपट, बीस्टच्या पुढे आहे, ज्याने यूएस मध्ये आगाऊ बुकिंगसाठी $658,000 घेतले. थलपथी विजय आणि पूजा हेगडे यांनी त्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
तिकीट ब्लॅकमध्ये 5000 रुपयांपर्यंत
बेंगळुरूच्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 800 ते 1400 रुपये ठेवण्यात आली आहे. तेथे सकाळी 6 वाजल्यापासून शो आयोजित केले जातात आणि सकाळपासून रात्रीपर्यंत शोच्या तिकिटांची किंमत 800 ते 1400 रुपये आहे. काही ठिकाणी तिकिटांची किंमतही २५०० रुपये ठेवण्यात आली आहे. आणि तिकीट ब्लॅकमध्ये 5000 रुपयांपर्यंत आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रजनीकांत हिमालयात
रजनीकांत त्यांचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हिमालयात जातात आणि जेलरच्या रिलीजपूर्वी त्यांनी असेच केले होते. ८ ऑगस्टला सकाळी ते चेन्नईहून हिमालयाकडे रवाना झाले. येथे एक आठवडा घालवणार आतहे. रजनीकांत दरवर्षी अध्यात्मिक प्रवासासाठी हिमालयात जातात, पण कोरोनाच्या काळात हे शक्य झाले नाही आणि चित्रपटांच्या शूटिंगमुळे वेळ काढू शकले नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत