.....अन महिला पोलीस अधिकारी सापडली मोबाईल चोरा सोबत
.....अन महिला पोलीस अधिकारी सापडली मोबाईल चोरा सोबत
वृत्तसंस्थां मुंबई-मुंबईच्या मुंब्रा पोलिस ठाण्यातील एक महिला पोलिस अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक चोराला पकडण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत आढळल्या. या विचित्र प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.
आरोपी मोबाईल चोराचे नाव सबिर शेर अली सय्यद असे आहे. तर त्याच्यासोबत सापडलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव कृपाल बोरसे आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपीची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले. त्यांनतर त्यांचे मोबाईल रेकॉर्ड चेक करण्यात आले असताना महिला पोलिस अधिकारी आणि आरोपी यांच्यात अनेक कॉल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
खेरवाडी पोलिस सबिर शेर अली सय्यद यांच्यावर लक्ष ठेवून असतानाच तो नवी मुंबईहून मुंबईला येत असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना खबरी मार्फत मिळाली होती. मात्र, आरेमध्ये येताच त्याचा मोबईल बंद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी त्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे मोबाईल लोकेशन आरे असल्याने पोलिसांनी परिसरात कारवाई केली. यावेळी ती पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे उघड झाले. यानंतर खेरवाडी पोलिसांनी या हॉटेलवर जाऊन कारवाई केली. तेव्हा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीबरोबर पोलिसांना मुंब्रा पोलिस स्टेशनची महिला पोलीस अधिकारीही आढळली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत