Contact Banner

वाकड रहिवाशी लेवा समाज समुहातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

Wakad-Residents-Take-Society-Group-Blood-Donation-and-Health-Camp-Enthusiasm


वाकड रहिवाशी लेवा समाज समुहातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात 

 लेवाजगत न्यूज पुणे- येथील वाकड लेवा समाज समूहाने नुकतेच सयुरी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबिर या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

     या शिबिरात तब्बल चाळीस हून अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नामांकित डॉक्टर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास हातभार लावला.

डॉ. अश्विनी नारखेडे(Gynac), डॉ. पियुष चौधरी(Gen. Physician), डॉ गिरीश भंगाळे (Dentist), डॉ. अजिंक्य चौधरी(Ortho), डॉ. सुयोग भारंबे(Gen. Surgeon), डॉ. शिशिर परतणे (Ayurveda) यांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना आरोग्य विषयी अमूल्य मार्गदर्शन केले.

     अनुभवी आणि नामांकित डॉ. सोहन नारखेडे(Eye specialist) ,डॉ. सुरेंद्र पाटील (पोलरीस हॉस्पिटल) यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

      कार्यक्रमास श्री विनायक पाटील काका, श्री. अशोक चौधरी सर, श्री. चंदन महाजन,श्री. धनंजय राणे, श्री. निलेश धांडे, श्री. जीवन बोरोले, सौ. स्मिता कोल्हे ताई, सौ. चारू पाटील, श्री. वैभव फेगडे, श्री. वैभव चौधरी, श्री. अतूल चौधरी, श्री. गौरव भंगाळे, श्री. पराग धांडे, इतर हॉस्पिटल आणि ब्लड बँक स्टाफ यांचा मोलाचा हातभार लाभला. 

     वाकड लेवा समाजाने गेल्या सव्वा वर्षात चार मोठे कार्यक्रम करून धूम धडाक्यात सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व वाकड रहीवाशीं मध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने या पुढेही असेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील असे लेवा समूहाचे नियोजन आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.