Contact Banner

सावदा मुन्सिपल स्टॉप को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी अरुण ठोसरे तर व्हाईस चेअरमन पदी विशाल करोशिया

 

Savda-Municipal-Stop-Co-operative-Credit-Society-Chairman- Arun-Thosare-Tar-Vice-Chairman- Vishal-Karoshiya

सावदा मुन्सिपल स्टॉप को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी अरुण ठोसरे तर व्हाईस चेअरमन पदी विशाल करोशिया

लेवाजगत न्यूज सावदा- सावदा पालिकेच्या म्युनिसिपल स्टाफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा ८ रोजी सकाळी १० वाजता पालिका सभागृहात पार पडली. एफ.आय.तडवी यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. संचालकांमधून झालेल्या निवडणुकीत अरुण शंकर ठोसरे यांची चेअरमन, व्हाईस चेअरमनपदी विशाल विजय करोसिया हे निवडून आले.

Savda-Municipal-Stop-Co-operative-Credit-Society-Chairman- Arun-Thosare-Tar-Vice-Chairman- Vishal-Karoshiya


पालिकेच्या विस्तारित कक्षाच्या सभागृहात झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत चेअरमन पदाच्या निवडणुकीत संचालकांमधून अरुण ठोसरे व मनोज वसंत चौधरी यांनी नामांकन दाखल केले होते. गुप्त मतदान पद्धतीने चेअरमन पदासाठी मतदान घेण्यात आले. यात अरुण ठोसरे यांना ९ तर मनोज वसंत चौधरी यांना २ मते मिळाली. अरुण ठोसरे हे चेअरमनपदी निवडून आले. यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी विशाल विजय करोसिया यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले. यावेळी संचालक हमीद तडवी, खंडेराव भास्कर, अर्जुन करोशिया, विशाल करोशिया, मनोज चौधरी, संजय भोई, विजय चौधरी,अरुण ठोसरे, पूजा लोखंडे, रवीना करोशिया, विश्वास साळी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.