Contact Banner

सावखेडा येथील जवान सुरत प्रवासादरम्यान बेपत्ता


 सावखेडा येथील जवान सुरत प्रवासादरम्यान बेपत्ता

लेवाजगत न्युज सावखेडा:-सावखेडा(ता. पाचोरा) येथील जवान सुरत प्रवासादरम्यान बेपत्ता झाल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

करण समाधान तडवी (वय २३) असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव असून, ते १२ नोव्हेंबरला पाचोरा येथील जारगाव चौफुली भागातून सुरत जाण्यासाठी खासगी लक्झरीत बसले.परंतु ते सुरत येथे पोहोचले नाहीत, अथवा घरीही परतले नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचे वडील समाधान तडवी यांनी शुक्रवारी (ता. २४) पाचोरा पोलिसात तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन निकम तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.