Contact Banner

उरण तालुक्याची मानाची श्री साई सेवा मंडळाची पायी पालखी निघाली शिर्डीला

Sri-Sai-Seva-Mandal-of-Uran-taluka-mana-palanquin-went-to-Shirdi


उरण तालुक्याची मानाची श्री साई सेवा मंडळाची पायी पालखी निघाली शिर्डीला

उरण (सुनिल ठाकूर )उरण तालुक्यातील श्री साई बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ (रजि.) उरण  वतीने काढण्यात आली असून गेली २२ वर्षे ही पदयात्रा निरंतर, श्रद्धामय, धार्मिक वातावरणाने शिस्तमय पद्धतीने आजही चालूच आहे. यंदा पदयात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. यंदा श्री साई सेवा मंडळ  यांच्या वतीने भव्य पालखी, वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर, देऊळवाडी (उरण शहर) येथून रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता श्री ची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाली आहे.




  पायी पालखी दिंडी निघाल्या नंतर तिचे जागो जागी भव्य स्वागत करण्यात आले. या मध्ये  पायी पालखी दास्तान फाटा येथे आल्यावर साई मंडळ चिर्ले च्या वतीने निळकंठ घरत यांनी स्वागत केले. तर जासई येथे सरपंच संतोष घरत यांनी दिंडीचे स्वागत केले. पायी दिंडी पालखी साई मंदिर वहाळ येथे पोचल्यावर साई देवस्थान च्या वतीने रवीशेठ पाटील यांनी पालखी चें भव्य स्वागत केले. यानंतर दुपारीसाई बाबाची मध्यान्ह आरती नंतर महा प्रसाद व विश्रांती नंतर साई पायी पालखी दिंडी चे शिर्डी च्या दिशेने प्रस्थान झाले.

     पहाटे ५:१५ वाजता ॐ श्री साईनाथाय नमः या मंत्राचा जप व पुढे मार्गस्थ, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, १२:३० श्री साई सच्चरित्राचे सामूहिक पारायण व साईस्तवन मंजरी वाचन, ३:३० पुढील मुक्कामाकडे प्रस्थान, सायंकाळी ६:१५ धुपारती, रात्री ८:३० महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आहे. तब्बल २६१ किलो मीटरचा पायी प्रवास (पदयात्रा) करून पालखी दत्त जयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच सोमवार दि २५/१२/ २०२३ रोजी सकाळी १० वाजता  श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचणार आहे. पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्य नारायणाची महापूजा शनिवार दि ०६ जानेवारी २०२४ रोजी श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, उरण येथे संपन्न होणार आहे.असे बोलताना श्री साई सेवा मंडळा चें अध्यक्ष संदिप पाटील यांनी बोलताना सांगितले.

 रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७ वा श्री ची पालखी व पादुका साई भक्तांच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिर देऊळवाडी येथे ठेवण्यात आले होते. साई भक्तांनी या श्री च्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.