Contact Banner

बाईकवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

 

Unfortunate-death of woman-by-falling-from-bike

बाईकवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

लेवाजगत न्यूज भुसावळ- तालुक्यातील बेलव्हाय येथील महिला दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.शिल्पा उमाकांत खाचणे वय ३० रा. बेलव्हाय ता. भुसावळ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.








    नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शिल्पा उमाकांत खाचणे या महिला आपले पती उमाकांत मोतीराम खासणे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय वास्तव्याला होत्या. जळगाव एमआयडीसीतील कंपनीत दोघे पती-पत्नी काम करून उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दोघेजण १९ डिसेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद गावात आले होते. मोबाईल दुरुस्ती करून पुन्हा बेलव्हाय येथे जाण्यासाठी ७.३० वाजता दुचाकीने निघाले. दरम्यान सिमेंटचा रस्ता असल्याकारणामुळे आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटला व महिला शिल्पा खाचणे ह्या जमिनीवर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषित केले. दरम्यान त्यांच्या आकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती उमाकांत खाचणे आणि दहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.