निंभोरा आरोग्य केंद्राला जिप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट
निंभोरा आरोग्य केंद्राला जिप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट
लेवाजगत न्यूज निंभोरा- निंभोरा आरोग्य केंद्राला जिप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट नव्याने बांधलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन संपूर्ण बांधलेल्या खोल्यांची व इमारतीची पाहणी करून अपूर्ण कामासंदर्भात याबाबत माहिती घेऊन संबंधितांना महत्वपूर्ण सूचना केल्या त्याचबरोबर नवीन इमारतीमध्ये फर्निचर व्यवस्था त्याचबरोबर पाणीपुरवठा व्यवस्था याबाबत विशेष माहिती घेतली.
इमारत कामात जी अपूर्णता आहे ते देखील पूर्ण व्हावी याबाबत संबंधितांना त्यांनी सूचना केल्या यावेळी रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंढे तसेच सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार ,ग्रामस्थ, सेवानिवृत्त पंचायत समिती अधिकारी महाजन यांच्याशी चर्चा केली यावेळी आरोग्य केंद्रातील जुन्या इमारतीत सद्यस्थितीत केंद्रातील ओ.पी.डी विभाग,औषध विभाग, प्रसूती गृह ,लससाठा, कोविड टेस्टिंग यासह आदी भागास त्यांनी भेटीतून डॉ.अजय रिंढे व निंभोरा आरोग्य केंद्रातील डॉ. चंदन पाटील आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन आरोग्य केंद्र चे सर्व कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सरपंच सचिन महाले ,प्रशांत पाटील, ललित कोळंबे ग्रा. प.सदस्य मनोहर तायडे सौ.मंदाकिनी बरहाटे, स्वप्निल गिरडे,राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक,मधुकर बिऱ्हाडे, विशाल तायडे यांनी चर्चा केली व स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आरोग्य पाहणी केली. यावेळी रावेर तालुका आरोग्य अधिकारी अजय रिंढे,डॉ.चंदन पाटील, आरोग्य कर्मचारी आर. के. पाटील,आर.आर. महाजन बी. व्ही इंगळे,आरोग्य सेविका श्रीमती मनीषा तायडे , श्रीमती आर. एल कोळी, रंजना तायडे, दिनकर बोरनारे, मिलिंद हंसकर, आशा स्वयंसेविका गटप्रवर्तिका विद्या शिंपी तसेच संतोष लोंढे ग्रामपंचायत कर्मचारी राहुल महाले, संतोष महाले ,विनोद गोरडकर,किशोर जावा यासह गावातील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत