एकलव्य कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावदा शहराध्यक्षपदी नियुक्ती
एकलव्य कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावदा शहराध्यक्षपदी नियुक्ती
लेवाजगत न्यूज सावदा -येथील एकलव्य कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव जिल्हा अंतर्गत सावदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली ऍड.रवींद्र प्रल्हादराव पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव यांच्या हस्ते एकलव्य कोल्हे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुक्ताईनगर विधानसभा अंतर्गत सावदा शहर अत्यंत महत्त्वाचे असून आमदार ठरवणारे शहर म्हणून सावदा शहराकडे पाहिले जाते म्हणून मा.आ.एकनाथराव खडसे यांचे हात बळकट करण्यासाठी एकलव्य कोल्हे यांनी सार्थ विश्वास दाखवत पुढील काम करण्याचा विडा उचलला आहे. एकलव्य कोल्हे यांच्या नियुक्तीवर माननीय एकनाथराव खडसे व महिला प्रदेशअध्यक्षा ऍड. रोहिनीताई खडसे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सावदा शहरातील समाजसेवक दूध संघ माजी संचालक जगदीश बढे,बाजार समिती माजी संचालक पंकज येवले, सय्यद अजगर,माजी नगरसेवक अजय भारंबे,विश्वास चौधरी,अतुल नेहेते, मुराद तडवी व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावदा शहर कार्यकर्ते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत