Contact Banner

चिनावल येथे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी बॅचचा विद्यार्थ्यांचा तब्बल ५५ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा

 

चिनावल येथे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी बॅचचा विद्यार्थ्यांचा  तब्बल ५५ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा

चिनावल येथे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी बॅचचा विद्यार्थ्यांचा  तब्बल ५५ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा 

 लेवाजगत न्यूज चिनावल - चिनावल विद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात १९६८ च्या एसएससी बॅचचा तब्बल ५५ वर्षांनी पुनर्मिलन सोहळा पार पडला. सर्वप्रथम सरस्वती व गणेश गायनाने पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर संस्थेच्या संस्थापक पदाधिकाऱ्यांसोबत, चेअरमन, सचिव, अध्यक्ष यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच संस्थेचे माजी पदाधिकारी व  नुकतेच दिवंगत अध्यक्ष श्रीकांत सरोदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरुवातीला एस.सी. सरोदे सरांनी सोहळ्याविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी सुमारे ४० ते ४५ माजी विद्यार्थी ५५ वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.  तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात बेंचवर बसून तत्कालीन आठवणी अनुभवल्या. व शाळेच्या प्रयोगशाळा तसेच इतर विभागांना भेटी देत आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचचे माजी मुख्याध्यापक एस.सी. सरोदे सर यांनी शाळेची व संस्थेची निर्मिती कशा पद्धतीने झाली त्याचबरोबर संस्थेच्या विविध शाखांची आपल्या बाल मित्रांना माहिती दिली.  यावेळी संस्थेचे सध्याचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व माजी मुख्याध्यापक सी.के. पाटील व शिक्षक सी.बी. जावळे सर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. 

           कार्यक्रमाच्या प्रास्ताविक एस. सी. सरोदे  यांनी केले, त्यांनी शालेय जीवन कसे होते त्याबद्दल माहिती देऊन आपल्या शालेय जीवनातील बऱ्याच आठवणींना उजाळा देत आपला आतापर्यंतचा जीवन प्रवास एकमेकांसोबत शेअर केला तसेच एकमेकांचे संसारिक सुख दुःख शेअर केले. कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी सर्वांनी भरीत पुरीचा जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे चेअरमन विनायक महाजन, सचिव गोपाळ पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र फालक ,संचालक मनोहर पाटील तसेच मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे पर्यवेक्षक पी एम जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार खेमचंद्र भिरूळ व टी.व्ही. जंगले यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.