Header Ads

Header ADS

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल



 पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था जळगाव-कोणत्याही कारणावरुन विवाहितेसोबत वाद विवाद करुन छळ केला जात होता. त्याला कंटाळून ममता रतीलाल राठोड (वय ३४, रा. साईनगर मन्यारखेडा, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पत्नीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील साईनगरात ममता राठोड या विवाहिता वास्तव्यास होत्या. विवाहितेचा पती हा नेहमी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तीच्यासोबत वाद घालत घालून तीला मारहाण करीत होता. वारंवार होणारा छळ असह्य झाल्याने दि. २५ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास विवाहितेच्या पतीने विवाहितेसोबत वाद घालून तीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे ममता राठोड यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार विवाहितेचा भाऊ मुकेश चव्हाण याने पोलिसात दिली. त्यानुसार संशयित रतीलाल भोजू राठोड (रा. पाल, ता. रावेर, ह. मु. साईनगर मन्यारखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.