Header Ads

Header ADS

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा धरणात बुडून मृत्यू

 

Death of fishing-young man drowning in dam

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा धरणात बुडून मृत्यू

 लेवाजगत न्यूज जळगाव-मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड, जळगाव) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात सागर सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याच परिसरात तो मासे विक्री करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. नेहमीप्रमाणे सागर हा शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, भिंतीवरुन पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडल्याने तो त्याठिकाणी बुडाला. ही घटना त्याठिकणी मासे पकडण्यासाठी गेेलेल्या काहीजणांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांसह मासे पकडणाऱ्यांच्या मदतीने सागरचा मृतदेह सायंकाळी उशिरा पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागरच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.