Header Ads

Header ADS

घरगुती विवाह मंडळांच्या सहकारी संस्थेच्या बैठकीचे आयोजन ३० एप्रिल रोजी दादर मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक

 

Domestic-Marriage-Boards-Cooperative Society Meeting-Organized-On-April-30-State-Level-Meeting-at-Dadar-Mumbai

घरगुती विवाह मंडळांच्या सहकारी संस्थेच्या बैठकीचे आयोजन ३० एप्रिल रोजी दादर मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा पवित्र संस्कार आहे. जगभर सर्व जाती धर्माच्या मंगलमय सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात विवाह हा एक सोहळा असतो. मात्र लग्नासाठी अनुरूप जोड्या जमवणं वाटतं तितकं सोपं नाही. आज अनेक संस्था मोठमोठाली कार्यालये थाटून हा व्यवसाय करत आहेत. तर अनेकजण घरूनच विवाह जमवून देत असतात. विविध प्रकारच्या उपवर मुलामुलींचे फोटो आणि माहिती घेतात. ज्यातून योग्य जोड्या जुळवून लग्न जुळवण्याचे काम घरातून करतात. महिलांना माणसं ओळखण्याचे नैसर्गिक ज्ञान असते. त्यामुळे त्या लग्नासाठी उत्तम स्थळ शोधून देतात. समाजेसेवेचं पवित्र कार्य करत असतात.

    आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शिव उद्योग संघटना व्यवसाय वृद्धीसाठी कार्य करते. त्याला अनुसरुनच घरगुती विवाह मंडळ समाजसेवा वाढविण्यासाठी मोठी सहकारी संस्था तयार करत आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व विवाह संस्थांच्या प्रमुख पदाधिकारी यांची एक सभा मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता पिंगेज क्लासेस, छबिलदास हायस्कूल समोर, कृष्णा वडापावाले गल्ली दादर पश्चिम मुंबई येथे शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. अधिक माहितीसाठी भास्कर चव्हाण ९२२३०८०८५६ यांच्याशी संपर्क साधा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.