Header Ads

Header ADS

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने जळगावात खळबळ

Excitement in Jalgaon due to the discovery of the dead body of an unknown person


अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने जळगावात खळबळ

लेवाजगत न्यूज जळगाव -शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा मृतेदह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहे. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.