Header Ads

Header ADS

आमदार एकनाथ खडसे उमेदवारी दाखल करणार? तातडीने घेतले नो ड्यूज प्रमाणपत्र

MLA-Eknath-Khadsen-candidacy-will-submit-urgently-taken-no-dues-certificate


आमदार एकनाथ खडसे उमेदवारी दाखल करणार? तातडीने घेतले नो ड्यूज प्रमाणपत्र

वृत्तसंस्था जळगाव-भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा करूनही प्रवेशाचा मुहूर्त लांबत असलेले आमदार एकनाथ खडसे यांनी महापालिका आणि इतरही सरकारी कार्यालयांकडून तातडीने ('नो ड्यूज')कोणतीही बाकी नसल्याचे  प्रमाणपत्र घेतल्यामुळे गुरुवारी रक्षा खडसे यांच्याबरोबरच ते स्वतः देखील उमेदवारी अर्ज भरतील का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

   गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. नियोजित कार्यक्रमानुसार भाजपचे जळगाव आणि रावेर मतदारसंघाचे दोन्ही उमदेवार स्मिता वाघ व रक्षा खडसे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहे; मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांचे डमी उमेदवार कोण असतील, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. कोणीही डमी अर्ज दाखल करणार नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात येत असले तरी एकनाथ खडसे यांनी अचानक व घाईघाईत कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जळगाव मनपा व अन्य सरकारी कार्यालयांकडून मिळवले आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांचे डमी उमेदवार म्हणून एकनाथ खडसे शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. खडसे यांच्या निकटवर्तियांनी मात्र, ते रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्ज दाखलच्या रॅलीतही सहभागी होणार नसल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.