महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज लाखोंच्या संख्येने मतदार राहणार उपस्थित
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज लाखोंच्या संख्येने मतदार राहणार उपस्थित
प्रतिनिधी रावेर-रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज (दि २४) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे (उबाठा गट) युवा नेते आदित्य ठाकरे ,संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आकरा वाजता दाखल करणार आहेत.
सकाळी सात वाजता श्रीराम पाटील हे महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रावेर येथील त्यांच्या संपर्क कार्यालय (श्रीराम आटो) येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) तर्फे श्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रस्थापितांविरुद्ध सामान्य कुटुंबातील उमेदवार अशी या मतदार संघात लढत होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रावेर मतदार संघातील ठिकठिकाणावरून मतदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे एकत्रित जमणार आहेत. नंतर तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन ठिक ११.०० वाजता अर्ज दाखल केला जाईल. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा अंदाज आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरु होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत