Header Ads

Header ADS

दीपनगर येथे राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape of a 12-year-old-minor-girl-living-in-Deepnagar


 दीपनगर येथे राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लेवाजगत न्यूज भुसावळ -भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला गच्चीवर बोलवून तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणारा संशयित आरोपी मोहन यशवंत सरदार याने पीडित मुलीला ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता गच्चीवर भेटण्यासाठी बोलावले. यावेळी पीडित मुलगी ही भेटण्यासाठी गेली असता त्यावेळी संशयित आरोपी मोहन सरदार याने पीडित मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी मोहन सरदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.