एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ, बसची दुरावस्था....तरीही बस सुरू
एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ, बसची दुरावस्था....तरीही बस सुरू
फोटो- यावल हून सुटणारी पाल हीच ती दुरावस्था झालेली बस
लेवाजगत न्युज खिरोदा :-
सावखेडा तालुका रावेर एसटी बस क्रमांक (एम एच १४ बी टी २७०५ ) ही बस यावल-पाल अशी सुरू असते, दिनांक २७ रोजी ही बस यावलहून फैजपूर ,सावदा, खिरोदा ,सावखेडा मार्गे पाल अशी गेली.
सावखेडा येथे बस सकाळी १०:३० वाजता येऊन पोहोचते. परंतु या बसची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. हि बस खिरोदा येथे आली तेव्हा ग्रामपंचायत सदस्य खिरोदा किशोर चौधरी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बसची नीट पाहणी केली असता, या बसच्या खिडक्या अक्षरशा दोरीने , ठिबकनळीने बांधलेल्या होत्या. दरवाजाची अवस्थाही खिळखिळी झालेली असून ही बस रस्त्याने चालताना खळखळ खळखळ असा आवाज करत चालते.
हि बस रस्त्याने चालवून एस टी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी जणू खेळ करत असल्याची भावना जनमानसामधून उमटत आहे.
संपूर्ण बसची अवस्था बिकट झालेली असून ही बस रोडने चालतेस कशी? व रोडने चालत असताना या बसचा जर अपघात झाला तर यास जबाबदार कोण?
त्यामुळे एसटी महामंडळाने ही दुरावस्था झालेली बस बंद करून ,त्या जागी चांगल्या कंडिशनची बस सुरू करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
प्रतिक्रिया-
सध्या यावल एस टी डेपोमध्ये गाड्यांची कमतरता असून पूर्वी ८२ गाड्या होत्या ,सध्या ५५ बसेस डेपोत आहे. सदर बस जळगाव कार्यशाळेत कामासाठी पाठवण्यात येणार आहे.
(यावल डेपो मॅनेजर डी बी महाजन)
प्रतिक्रिया-
दिनांक २६ रोजी यावल डेपो मॅनेजर महाजन साहेब यांना फोन करून यावल पाल बस विषयी माहिती दिली की ,बस अत्यंत खराब व दयनीय झालेली आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. या बसच्या खिडक्या दरवाजे दोरीने ,वायरने ठिबक नळी च्या साह्याने बांधलेल्या आहेत. एस टी महामंडळ ड्रायव्हर कंडक्टर यांच्याबरोबर प्रवाशांचाही जीव धोक्यात घालत आहेत. तरी सदर बस लगेच बदलवून मिळावी...
(ग्रामपंचायत सदस्य खिरोदा प्र.यावल किशोर सुधाकर चौधरी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत