Header Ads

Header ADS

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खासगी बसला आग,बस मध्ये होते ४२प्रवाशी

 

There were 42-passengers-in-a-private-bus-bus-on-fire-on-Mumbai-Pune-Expressway.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खासगी बसला आग,बस मध्ये होते ४२प्रवाशी 

वृत्तसंस्था रायगड-मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ माजली होती. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.

    मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती बस 

मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच सर्व प्रवासी सुखरुप आहेत. ४२ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच हा मोठा अनर्थ टळल्याचे म्हटले आहे. ही बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बस मधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्स च्या समयसुचकतेमुळे ४२ जणांचे प्राण वाचले. दरम्यान, आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

     दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश 

याशिवाय बसने महामार्गावर अचानक पेट घेतल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम हा देखील झाला. या घटनेमुळे काही काळ या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मध्यरात्री त्याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.