Header Ads

Header ADS

वढोदा येथे घर फोडी 2 लाख 24 हजारांचा मुद्देमाल लांबवला


 वढोदा येथे घर फोडी 2 लाख 24 हजारांचा मुद्देमाल लांबवला

लेवाजगत न्युज यावल : यावल तालुक्यातील वढोदा येथे एका घराच्या दरवाज्याला अडकण म्हणून लावलेला पत्रा उचकावून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील कपाटाच्या दरवाज्याचे लॉक तोडून लॉकरमधील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल लांबवला. कुटुंब घराच्या छतावर झापलेले असतांना ही चोरी झाली व ही चोरीची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्रा वाकवत चोरट्याचा प्रवेश

वढोदा, ता. यावल या गावातील रहिवासी प्रदीप दिनकर सपकाळे हे रविवारी रात्री आपल्या कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते.

     मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरात घरफोडी झाली. त्यांच्या दरवाज्याच्या अडकण म्हणून लावलेला पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने वाकवला आणि घरात प्रवेश केला व कपाटाचे लॉक तोडून लॉकर उघडून त्यात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल तेथून चोरी केला. चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. प्रदीप सपकाळे यांनी यावल पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सुनील मोरे आदींनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.