Contact Banner

शुक्रवार रोजी सकल हिंदू समाजातर्फे सावदा बंदचे आवाहन

 

शुक्रवार रोजी सकल हिंदू समाजातर्फे सावदा बंदचे आवाहन

शुक्रवार रोजी सकल हिंदू समाजातर्फे सावदा बंदचे आवाहन

लेवाजगत न्यूज सावदा:-  बांगलादेशात हिंदूवर होत असलेला अत्याचार व मंदिरावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जलगाव जिल्हा बंदचे आवाहन साधू संतांसह हिंदू संघटनांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावदा शहरातील महानुभाव मंदिरात दिनांक १३ रोजी संध्याकाळी आठ वाजता एका बैठकीत शुक्रवार रोजी शंभर % सावदा शहर बंद ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. तरी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेल्या या आव्हानास प्रतिसाद देऊन बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण  दिवसभर सावदा शहरातील दुकाने बंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.