Contact Banner

लालकृष्ण अडवाणी एम्स रुग्णालयात दाखल

 

LK-Advani- admitted to AIIMS-hospital

लालकृष्ण अडवाणी एम्स रुग्णालयात दाखल 

लेवाजगत न्यूज दिल्ली -भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (९६) यांची प्रकृती मंगळवारी पुन्हा एकदा खालावली. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





यापूर्वी २६ जून रोजी दिल्लीच्या एम्समधील यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सुमारे आठवडाभरानंतर रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अपोलोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, एक दिवसानंतर ते घरी परतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.