Contact Banner

ईद-ए-मिलादचा जुलूस १६ ऐवजी १८ला निघणार

ईद-ए-मिलादचा जुलूस १६ ऐवजी १८ला निघणार


 ईद-ए-मिलादचा जुलूस १६ ऐवजी १८ला निघणार

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी जळगाव-ईद-ए-मिलादुन्नबी १६ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी मुस्लिम बांधव भव्य असा जुलूस काढून हा सण साजरा करतात; मात्र यंदा ईद-ए-मिलादच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने प्रशासनाची फार मोठी गैरसोय होणार आहे. याबाबत सुन्नी मुस्लिम बांधवांची बैठक जळगांव येथिल भिलपुरा सुन्नी जामा मशिदीत झाली. यात ईद मिलादचा जुलूस १६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्यात येणार असल्याचे सुन्नी जामा मशीद, सुन्नी ईदगाह ट्रस्ट व जुलुसे ईद मिलादुन्न बी कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी सांगितले. याबाबतचे पत्र मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिले. या वेळी इक्बाल वजीर, सय्यद जावेद, शाकीर चीतलवाला, आसिफ शाह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.