Contact Banner

शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा किड्स स्पोर्ट्स कार्निवल प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Kids-sports-carnival-inspiring-school-students-innovative-initiative-of-Pragya-Vardhini-Foundation-and- MaxGyan-Sports


शालेय विद्यार्थ्यांना  प्रेरणा देणारा किड्स स्पोर्ट्स कार्निवल

प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स तर्फे शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी बोरिवली पश्चिम येथील सुविद्या स्पोर्ट्स अकादमी येथे किड्स स्पोर्ट्स कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशनच्या विश्वस्त एडवोकेट रूपाली ठाकूर, विश्वस्त वैशाली भिडे बर्वे, विश्वस्त महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत खटाव,  अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे विल्फ्रेड मेनेझेस, एमसीए क्रिकेट प्रशिक्षक नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सरचिटणीस नरेंद्र बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.




उत्तर मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळजी शेट्टी आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी यावेळी १५ शाळांमधील ८५० पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी शिस्त आणि संयम विकसित करण्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून दिले. गोपाळ शेट्टी यांनी 'खेळ आपल्याला शिस्तबद्धता आणि योग्य संयम शिकवतात' याबद्दल मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मुंबई उपनगराला नजीकच्या भविष्यात स्पोर्ट्स हब बनवण्याचा आपला संकल्प जाहीर केला. सदर कार्यक्रम जबरदस्त यशस्वी ठरला, ज्यामुळे विद्यार्थांना खेळ आणि त्याची मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.