Contact Banner

मस्कावदच्या खेळाडूंचे राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश

Success of athletes of Muskawad in state-weightlifting-competition


राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत मस्कावदच्या खेळाडूंचे यश

लेवा जगत न्यूज सावदा येथून जवळच असलेल्या मस्कावद तालुका रावेर येथील तीन खेळाडूंनी छत्रपती संभाजी नगर येथेदिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी  झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२४ मध्ये यश मिळवले आहे.




    मस्कावद येथील रोहन कन्हैया भालेराव वजन गट ४९ किलो याने प्रथम क्रमांक, राहुल कन्हैया भालेराव ५५ किलो गट चौथा क्रमांक तर प्रतिक योगेश कोळी ६७ किलो गट सहावा क्रमांक पटकावला असून मस्कावत गावाचे नाव त्यांनी उंचावले आहे .त्यांचा सर्व मित्र परिवारातर्फे शाल पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रोहित हा सावदा येथील श्री आ.गं. हायस्कूल मध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत असून राहुल नववी मध्ये तर प्रतीक दहावी मध्ये मस्कावद येथिल वा.कृ. पाटील  हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. त्यांच्या यशाने संपूर्ण गावात त्यांच्या मित्र परिवारातर्फे आप्तेष्टांतर्फे त्यांचे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.