Contact Banner

लहान वाघोदा येथील लोकनियुक्त सरपंच यांनी गावातील सर्जा राजांचे मालक कष्टकरी शेतकरी यांचा टोपी,श्रीफळ व शुभेच्छा पत्र देऊन केला सन्मान

 

The-people-appointed-sarpanch-of-small-waghoda-honored-the-village-sarja-rajas-owner-of-the-farmers-with-a-hat-of-shrifal-and-a-letter-of-congratulations.


लहान वाघोदा येथील लोकनियुक्त सरपंच यांनी गावातील सर्जा राजांचे मालक कष्टकरी शेतकरी यांचा टोपी,श्रीफळ व शुभेच्छा पत्र देऊन केला सन्मान

लेवाजगत न्यूज लहान वाघोदा -तालुका रावेर येथिल कष्टकरी शेतकरी राजा यांच्या सर्जा राजांचा बैल पोळा सण हा  आज सोमवार रोजी आगळा वेगळा पध्दतीने साजरा करण्यात आला. गावात प्रथमच सर्जा राजा यांचा बैल पोळा सण हा गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ .दिपाली जितेंद्र चौधरी ( मॅडम ) व सामाजिक कार्यकर्ते भाजपा रावेर तालुका चिटणीस तथा ग्रा . पं . सदस्य श्री.जितेंद्र चौधरी ( सर )यांनी गावातील सर्जा राजांचे मालक कष्टकरी शेतकरी यांना टोपी , श्रीफळ व शुभेच्छा पत्र देऊन सन्मानित केले. 




     गावात असलेल्या ३२ सर्जा राज्या जोडी मालकांचा टोपी घालून श्रीफळ व शुभेच्छा पत्र देऊन गावात प्रथमच शेतकरी राजाला सन्मानकरण्यात आला.   

      सन्मान सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी सर व त्यांच्या पत्नी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ . दिपाली चौधरी या दाम्पत्याने केला. त्यामुळे त्यांचे कौतुक परिसरात होत आहे. माझा कष्टकरी शेतकरी राजा रात्र दिवस राबतो आणि त्यांना साथ मिळत असते ती या सर्जा राजा जोडीची आणि अशा सर्जा राजाचा आज बैल पोळा सण यानिमित्ताने सर्व कष्टकरी शेतकरी राजांना खुप खुप शुभेच्छा दिल्या,तसेच माझ्या या कष्टकरी शेतकरी राजास कठीण परिस्थितीत स्वतःच्या हिमतीने उभे राहण्याची व भरपूर धनधान्य पिको हीच परमेश्वर चरणी प्रार्थना व पुन्हा सर्वांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.