Contact Banner

बॉलिवूड अभिनेते गोविंदाच्या पायाला लागली गोळी रुग्णालयात दाखल

 

बॉलिवूड अभिनेते गोविंदाच्या पायाला लागली गोळी

बॉलिवूड अभिनेते गोविंदाच्या पायाला लागली गोळी रुग्णालयात दाखल

लेवा जगत न्यूज मुंबई -बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. त्याच्याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडली होती. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली.


   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूक साफ करताना मिस फायरिंगमुळे गोविंदाला गोळी लागली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याची बंदूक जप्त केली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

    गोळी लागल्याने त्याच्या पायातून खूप रक्त वाहत होते, त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. सध्या त्यांना अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

   कुली नंबर १, हिरो नंबर १, राजा बाबू, छोटे सरकार, हद कर दी आपने यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला गोविंदा गेल्या ५ वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. २०१९ चा रंगीला राजा हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.