जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये "व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण"कार्यक्रम संपन्न
जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये "व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण"कार्यक्रम संपन्न
लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये नुकताच तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण" कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पुण्याच्या रीलायेबल आयटी स्कूल च्या दीपिका गोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम आहे जो एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, गुण, वर्तन आणि संपूर्ण स्व-प्रतिमा सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक आत्मविश्वास, प्रभावी आणि उत्तम व्यक्ती बनण्यास मदत करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
व्यक्तिमत्व विकास ही एक आजीवन प्रक्रिया आहे ज्यामध्ये अधिक प्रभावशाली आणि भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्ती बनण्यासाठी विविध कौशल्ये, वृत्ती आणि गुणधर्म आत्मसात करणे समाविष्ट आहे.
या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास दीपिका गोटे यांनी व्यक्त केला .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, सर्व विभाग प्रमुख डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, डॉ.के. एस.भगत, प्रा.ओ.के. फिरके, प्रा मोहिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी प्रा. ए.बी.नेहेते, प्रा.एम.जी. भंडारी, प्रा.जी.डी.बोंडे, प्रा.टी.डी. गारसे, प्रा.स्वप्नाली वाघुळदे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत