Header Ads

Header ADS

मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला ! विद्यमान आमदाराच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष

मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला ! विद्यमान आमदाराच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष


 मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला ! विद्यमान आमदाराच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष

लेवा जगत न्यूज सावदा -विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून जागा वाटपाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. महायुतीत जेथे विद्यमान आमदार आहेत ती जागा त्या पक्षाला सोडणार असे सूत्र ठरले असले तरी याला मुक्ताईनगर विधानसभा अपवाद ठरणार आहे. महायुतीच्या निर्णयानुसार मुक्ताईनगरची जागा भारतीय जनता पक्षाची असून ती जागा लढण्यावर भाजपा ठाम असून त्याला शिंदेसेना देखील अनुकूल असल्याचे वृत्त आहे. ही जागा भाजपाने लढविली तर विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ युतीच्या फॉम्युल्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे आहेत. मराठी परंपरागत युतीच्या काळात हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे राहिलेला आहे व यावर सतत विजय मिळवला असून भाजपने या मतदारसंघावर दावा केला होता. २०१९ चा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे येथे भाजपाचा आमदार राहिला आहे. २०१९ मध्येही भाजपाने निवडणूक लढविली होती मात्र त्यात यश आले नाही. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे यात विजयी झाल्याने त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. महायुतीच्या म्हणण्यानुसार आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष लढल्याने ते युतीचे घटक होवू शकत नाही त्यांनी केवळ पाठींबा दिल्याने शिंदेसेनेला जागा सोडणे योग्य होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाजपाचे मोठे कार्यकर्ते या मतदारसंघात सक्रिय असल्याने आणि युतीत ठरल्याप्रमाणे भाजपची जागा असल्याने ती भाजपच लढणार आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आता यक्षप्रश्न उभा ठाकला असून ते महायुतीत काम करणार की अपक्ष लढणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

भारतीय जनता पार्टी कडून मुक्ताईनगर मतदार संघात रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील नंदू महाजन तर मुक्ताईनगर तालुक्यातील अशोक कांडेलकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.