Contact Banner

आज माझ्यासाठी इथे सगळे जण आपला अमूल्य वेळ देत आहात मी तो सत्कारणी लावेल आणि येणारा माझा पूर्ण वेळ हा तुमच्या सगळ्यांसाठी जनसेवेसाठी असेल - धनंजय चौधरी

Today-everyone-here-is-giving-their-valuable-time-for-me-I-will-acknowledge-it-and-my-full-time-to-come-will-be-for-public-service-for-all-of-you-Dhananjay-  Chaudhary


आज माझ्यासाठी इथे सगळे जण आपला अमूल्य वेळ देत आहात मी तो सत्कारणी लावेल आणि येणारा माझा पूर्ण वेळ हा तुमच्या सगळ्यांसाठी  जनसेवेसाठी असेल - धनंजय चौधरी

 लेवाजगत न्यूज फैजपूर -रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचेअधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनीआज गुरुवार रोजी सकाळी  फैजपूर येथील "तीर्थक्षेत्र खंडोबा महाराज मंदिर येथे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांचे अध्यक्षतेखाली आमदार शिरीषदादा चौधरी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष मा.श्री प्रदीपदादा पवार , जिल्हा उपाध्यक्ष हाजी छब्बीर शेठ, शिवसेना जिल्हा समनव्यवक प्रल्हादकाका महाजन,  माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे ,श्री लिलाधरशेठ चौधरी, श्री किशोर पाटील ,श्री मुकेश येवले सर, श्री हरीशशेठ गणवाणी, श्री दिपकदादा पाटील, श्री गोंडू महाजन,राजुदादा सवरणे,श्री भालचंद्रशेठ भंगाळे ,महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गणेश पूजन व खंडोबा महाराजांची आरती करून प्रचार नारळ फोडून विधानसभा मतदार संघात  प्रचारास सुरवात केली. 

      यावेळी  बोलतांना उमेदवार धनंजय चौधरी यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की आम्ही आमची पिढी ही सामाजिक कार्यासाठी अखंड सेवा देणारी पिढी आहे.आता आता वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण करणं चालू आहे अहो पण आम्ही सकाळी उठल्यापासून आमची सुरुवातच ही रामनामाने होते तर यामध्ये हे द्वेषाचे राजकारण का करावे. माझ्यासाठी आज तुम्ही सगळे नेते मंडळी आणि जेष्ठ एकत्र आले मी आज एक शब्द देतो,आज मला दिलेला तुमचा प्रत्येक वेळ आम्ही सत्कारणी लावण्याचा तर प्रयत्न करेलच मात्र माझी येणारे पुढचे सगळे वर्ष ही माझ्या जनसेवेसाठी लावेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.  

     यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.