महायुतीचे महेश बालदी यांची पुन्हा आमदार पदी निवड
महायुतीचे महेश बालदी यांची पुन्हा आमदार पदी निवड
लेवाजगत न्यूज उरण ( सुनिल ठाकूर )-उरण विधानसभा मतदार संघ १९० निवडणूक २०२४ अंतर्गत झालेल्या गुरुवार ( दि. २० ) रोजी झालेल्या मतदानची मोजणी शनिवार ( दि. २३ ) रोजी झाली . त्यात उरण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महेश बालदी हे पुन्हा आमदार निवडून आले आहेत त्यांना एकूण ९५,०५५ मते ते शेकाप चे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना ८७,२४८ ,तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांना ७१,२७६ मते मिळाली .असून महायुतीचे उमेदवार महेश बालदी दुसऱ्यादा निवडून आले आहेत .
महेश बालदी हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने उरण शहरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली . गुलाल उधळून व फटाके वाजवून जल्लोषाने आनंद साजरा केला .
मिरवणुकीत भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह ,माजी नगरसेवक राजेश ठाकूर ,व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते त्याच प्रमाणे चिरनेर येथे उत्साहात उद्योजक राजाशेठ खार पाटील यांचासह कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून आपला आनंद व्यक्त केला .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत