मार्च अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका- मुंबईतील बैठकीत भाजप जिल्हाध्यक्षांना संकेत
मार्च अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका- मुंबईतील बैठकीत भाजप जिल्हाध्यक्षांना संकेत
लेवाजगत न्यूज सावदा-विधानसभा निवडणुकीत - मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर - भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक घेण्याच्या तयारीत आहे. पक्षाला चांगले वातावरण असून त्याचा फायदा - घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. जास्तीत जास्त सदस्य - नोंदणी करण्याच्या सुचना देत चार महिन्यात निवडणुकींना सामोरे जाण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
दरम्यान विजयाला ४८ तास उलटत नाही तोपर्यंत भाजपकडून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुंबईत घेतली.
यावेळी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. आगामी चार महिन्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचे असल्याचे संकेत मिळाल्याचे सूत्रांनी सांगीतले. दरम्यान भाजपकडून मार्च अखेर निवडणुकीचे नियोजन केले जात असून बारावी व दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत