Contact Banner

अग्नितांडाव-बोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीला लागली भीषण आग,अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

 

Boisar-Tarapur-MIDC-Chemical-Company-Fire-Breaks-Major-Fire-Three-Fire-Fighting-Force-Vehicles-Reached-Scene

बोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीला लागली भीषण आग,अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

लेवाजगत न्यूज बोईसर तारापूर:- तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

   आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी हे एक मानले जाते. बोईसर सालवड शिवाजी नगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. प्लॉट नंबर के-६ येथील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्यात कामगारांना सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आगीचे करण अद्याप अस्पष्ट आहे. हा कारखाना केमिकलचा असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि या आगीचे रूपांतर भीषण स्वरूपात झाले आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे लोळ तसेच धूर परिसरात दूरवर पसरल्याचे दिसून आले.

यू के अरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे, आणि त्याच परिसरातील श्री केमिकल कंपनीलाही आग लागली आहे. यामुळे श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आहे. या घटनेत सुदैवाने कामगारांनी आग लागल्यानंतर लवकरच पळ काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. प्रशासनानुसार, आगीच्या दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकलेले नाहीत. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले आहे. शिवाजीनगर बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी खोदल्याने आग विझवणाऱ्या गाड्यांसाठी वाहतूक अडचणी निर्माण झाल्या आहेत. घटनास्थळी परफ्युम आणि प्रेग्नंसीस उत्पादन करणारा एक कारखाना होता, आणि या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकल साठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.