पोहण्यासाठी बंधाऱ्यात गेलेल्या वकिलासह 3 जणांचा मृत्यू
पोहण्यासाठी बंधाऱ्यात गेलेल्या वकिलासह 2 जणांचा मृत्यू
लेवाजगत न्युज परोली :- पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात रविवारी दुपारी 4 वाजता हा प्रकार घडला. मयतांमध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलीप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमल्यानंतर हा प्रकार घडला.
दरम्यान बंधाऱ्याच्या काठावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यामुळे परोली बंधाऱ्यावर एकच गर्दी जमली होती.
बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लॉईड गेला असताना तोही बुडाला. बंधाऱ्याच्या काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरड करताच नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत