गेट वे ऑफ इंडिया लगत पर्यटक प्रवासी बोट बुडाली, एक जण ठार
गेट वे ऑफ इंडिया लगत पर्यटक प्रवासी बोट बुडाली, एक जण ठार
लेवाजगत न्यूज मुंबई : एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून आतापर्यंत या बोटीवरील २१ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेच एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या बोटीवर ३० ते ३५ प्रवासी होते. त्यांना वाचवण्यासाठी नौदल व मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
एलिफंटा येथे जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे समजते. नौदल, जेएनपीटी व तटरक्षक दल व यलोगेट पोलीस ठाण्याच्या तील आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य चालू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मुंबई सागरी मंडळाचे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.
दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई येथील गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे, निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटना ग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत