उदळी खूर्द येथे भागवत कथा व हरीनाम किर्तन सप्ताहाची सांगता
उदळी खूर्द येथे भागवत कथा व हरीनाम किर्तन सप्ताहाची सांगता
लेवाजगत न्यूज तासखेडा (प्रतिनिधी )येथुन जवळच असलेल्या उदळी खूर्द येथे सालाबाद प्रमाणे ३६ वर्षाची परंपरा कायम स्वरूपी जपत अखंड हरीनाम किर्तन सोहळा व भागवत कथा कार्यक्रम दि २७ रोजी हभप दिपक महाराज निंभोरा सिम यांच्या काल्याच्या हरी किर्तनाने सोहळ्या संपन्न झाला .
येथे दि. २० तारखे पासून ते २७ तारखे पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन सर्व गामस्थांच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते .
दैनंदीन कार्यक्रमात दररोज सकाळी ५ते ७ विष्णु सहस्त्रनाम व काकड आरती सकाळी८ ते १२ भागवत कथा दुपारी २ ते ५ कथा संध्याकाळी ५ ते ६ हरीपाठ संध्याकाळी ८ते १० हरी किर्तन आयोजन करण्यात आले होते . हरी किर्तन सत्रात दि. २० रोजी हभप नितीन महाराज मलकापूर दि २१ रोजी हभप काशीनाथ महाराज कोळन्हावी दि २२ रोजी हभप विजय महाराज मोताळा दि . २३ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पुनगांव दि.२४ रोजी हभप भरत महाराज म्हैसवाडी दि . २५ रोजी हभप गजानन महाराज काकोडा २६ रोजी हभप दत्तात्रय महाराज साकरी व दि २७ रोजी हभप दिपक महाराज निंभोरा सिम यांचे काल्याचे हरी किर्तन संपन्न झाले . यानंतर संपूर्ण गावाला व परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा स्वाद घेतला . संध्याकाळी ६ ते ८ दिंडी सोहळा संपूर्ण गावातून निघाला त्यानंतर परत कथा मंडपात ८ ते १० या वेळेत हभप. रघूनाथ महाराज सिल्लोड कर यांचा भारूडांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला . आयोजक मंडळींचे सर्व गामस्थांनी आभार व्यक्त केले व ही परंपरा सातत्याने सुरू ठेवा असे भाविक भक्त मंडळींनी सुचवले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत