यु.ई.एस.स्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी मध्ये "वार्षिक स्नेहसम्मेलन" उत्साहात साजरा
यु.ई.एस.स्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी मध्ये "वार्षिक स्नेहसम्मेलन" उत्साहात साजरा
उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर-शुक्रवार दिनांक १०-०१-२०२५ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी मध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन भव्यदिव्यपणे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द साहित्यिक व वक्ते, सन्माननिय डॉ. संजय कळमकर उपस्थित होते. त्यांचा सत्कार यु.ई.एस. संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष श्री. मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव अॅड, अपूर्वा ठाकूर, ज्येष्ठ सदस्य आणि खजिनदार चंद्रकांत ठक्कर, सदस्य अॅडव्होकेट राजेंद्र भानुशाली यांचाही सन्मान सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका ह्यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्राथमिक, पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका व समन्वयक उपस्थित होते. तसेच व्यासपीठासमोर स्थानापन्न असलेल्या सर्व मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे हितचिंतक ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विदयार्थी, यु.ई.एस. च्या भव्य पटांगणात जमले होते, संपूर्ण पटांगणच तुडुंब गर्दीने फुलले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया आणि सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता यांनीही पी.पी.टी.द्वारे वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर यु.ई.एस. संस्थेचे मानद सचिव श्री. आनंद भिंगार्डे व अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननिय डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या भाषणातून साहित्याचा समाज मनावर होणारा परिणाम इत्यादी अनेक विषयांवर मौलीक असे भाष्य केले.
आजच्या ह्या कार्यक्रमात परीक्षा व क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या शाळा व कॉलेजमधील सर्व अभ्यासू व गुणवान विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. उरण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण ७ बक्षिसे मिळविल्याबददल सर्व विदयार्थी व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, ज्यु. कॉलेज व सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या जबरदस्त नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या चित्तवेधक नृत्यांनी संपूर्ण वातावरणच जणू उल्हासमय झाले होते. सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचं स्वागत, आभार प्रदर्शन यु. ई. एस. परिवारातील शिक्षकांनी केले. ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन पहिली ते पंधरावीच्या विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी केले, ज्यास सर्वांनी भरभरून दाद दिली. संप्तरंगानी सजलेल्या भव्यदिव्य स्नेहसम्मेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत